महत्वाच्या तारखा

अर्ज सुरुवात

1 जुलै 2024

अंतिम तारीख

15 ऑक्टोबर 2024

सूचना: अर्ज भरत असतांना अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.
📅 Installment Dates - हप्त्यांचे वेळापत्रक
Installment Date Amount Status
14th Installment (ऑगस्ट हफ्ता) 11 सप्टेंबर 2025 ₹1,500 Released
13th Installment (जुलै हफ्ता) 06 ऑगस्ट 2025 ₹1,500 Released
12th Installment (जून हफ्ता) 07 जुलै 2025 ₹1,500 Released
11th Installment (मे हफ्ता) 05 जून 2025 ₹1,500 Released
10th Installment (एप्रिल हफ्ता) 03 मे 2025 ₹1,500 Released
8th & 9th Installment (फेब्रुवारी/मार्च) 08 मार्च 2025 / 12 मार्च 2025 ₹3,000 Released
7th Installment (जानेवारी हफ्ता) 25 जानेवारी 2025 ₹1,500 Released
6th Installment (डिसेंबर हफ्ता) 25 डिसेंबर 2024 ₹1,500 Released
4th & 5th Installment (ऑक्टोबर/नोव्हेंबर) 4 ऑक्टोबर 2024 ₹3,000 Released
3rd Installment (सप्टेंबर हफ्ता) 25-30 सप्टेंबर 2024 ₹1,500 + ₹4,500 Released
1st & 2nd Installment (जुलै/ऑगस्ट) 14-17 ऑगस्ट 2024 ₹3,000 Released
✅ पात्रता - Eligibility Criteria

पात्रता शर्ती:

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला
  • कमीत कमी वय 21 वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे

अपात्रता शर्ती:

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयापेक्षा अधिक आहे
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा भारत/राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत
  • सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत रु. 1500/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत/राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे
📄 आवश्यक कागदपत्रे - Required Documents
📱 आधार कार्ड
🏠 अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
💰 उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी राशन कार्ड
✍️ अर्जदाराचे हमीपत्र
🏦 बँक पासबुक
📷 अर्जदाराचा फोटो
👨‍👩‍👧‍👦 महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे
महत्वाची सूचना: सर्व कागदपत्रे मूळ आणि झेरॉक्स प्रती घेऊन या. आधार कार्डमधील माहिती आणि अर्जामधील माहिती सारखी असावी.
📝 अर्ज प्रक्रिया - Application Process

🌐 Online Application:

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज Nari Shakti Doot या अँप वर आणि आधिकारिक पोर्टल वर करता येईल.

🏛️ आधिकारिक पोर्टल

ladakibahin.maharashtra.gov.in

🏢 Offline Application:

ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांनी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी अर्ज करू शकतात:

  • अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका
  • सेतु सुविधा केंद्र
  • ग्रामसेवक
  • समूह संसाधन व्यक्ती (CRP)
  • आशा सेविका
  • वार्ड अधिकारी
  • CMM (सिटी मिशन मॅनेजर)
  • मनपा बालवाडी सेविका
  • मदत कक्ष प्रमुख
  • आपले सरकार सेवा केंद्र
📞 संपर्क माहिती - Contact Information

हेल्पलाइन टोल फ्री नंबर

📞 181

24x7 उपलब्ध | निःशुल्क सेवा

📍 कार्यालयाचा पत्ता:

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई – 400032, महाराष्ट्र, भारत